Vaibhav Suryavanshi बद्दलच्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ! सचिन तेंडुलकरशी तुलना? आगरकर, गंभीर यांना विचारला सवाल

Vaibhav Suryavanshi Shashi Tharoor statement viral : भारतीय क्रिकेटमधील युवा प्रतिभा वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांचं एक धाडसी वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
Shashi Tharoor puts young batting prodigy Vaibhav Suryavanshi in the Sachin Tendulkar bracket

Shashi Tharoor puts young batting prodigy Vaibhav Suryavanshi in the Sachin Tendulkar bracket

esakal

Updated on

Shashi Tharoor questions selectors over Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्वयंशीने पु्न्हा एकदा वादळी खेळी करताना अनेक विक्रमांना आपल्या कवेत घेतले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बिहारच्या उप कर्णधाराने पदार्पणात अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ८४ चेंडूत १९० धावांची धमाकेदार खेळी केली. या धमाकेदार कामगिरीमुळे बिहारने ६ बाद ५७४ धावा केल्या, जी विजय हजारे ट्रॉफी आणि लिस्ट ए इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली. त्याने या कामगिरीसह अनेक विक्रम नावावर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com