
भारत आणि इंग्लंड संघात सध्या बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. त्यातही कर्णधार शुभमन गिलने पहिला डाव गाजवला आहे.
शुभमन गिलने पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावलं. त्याचं कसोटीतील हे पहिलं द्विशतक पाहण्याची संधी भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंना म्हणजे १९ वर्षांखालील भारतीय संघालाही मिळाली.