Vaibhav Suryavanshi has a golden chance to create history at the World Cup
ESAKAL
Vaibhav Suryavanshi Under 19 World Cup performance : भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याचा पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा वन डे सामन्यात त्याने मैदान गाजवले. आता त्याचे सर्व लक्ष १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेवर आहे आणि १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत वैभवला ५ मोठे विक्रम खुणावत आहेत. याशिवाय तो विराट कोहली व शुभमन गिल या भारताच्या सध्याच्या घडीच्या स्टार फलंदाजांचा विक्रमही मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.