Vaibhav Suryavanshi Shatters Rishabh Pant’s 10-Year-Old Record
esakal
India U19 vs South Africa Youth ODI series result: भारताच्या १९ वर्षांखालील संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघावर विजय मिळवला. कर्णधार वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi ) वादळी खेळी करताना भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आफ्रिकेच्या २४५ धावांचा पाठलाग करताना भारताने २३.३ षटकांत २ बाद १७६ धावा केल्या आणि पावसामुळे रद्द झालेल्या लढतीत भारताचा डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट्स व २१ चेंडू राखून विजय पक्का झाला. या सामन्यात वैभवने २४ सामन्यांत १ चौकार व १० षटकारांसह ६८ धावांची खेळी करून रिषभ पंतचा ( Rishabh Pant) विक्रम मोडला.