Vaibhav Suryavanshi: ३१ चेंडूंत १५४ धावा! वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड; एबी डिव्हिलियर्सचा सर्वात मोठा विक्रम मोडला, पहिला भारतीय ठरला

Vaibhav Suryavanshi world record in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत वैभव सूर्यवंशीने क्रिकेटच्या इतिहासात खळबळ उडवणारी खेळी केली आहे. अवघ्या १४ वर्षे २७२ दिवसांच्या वयात वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान मिळवला.
Vaibhav Suryavanshi creates history in Vijay Hazare Trophy

Vaibhav Suryavanshi creates history in Vijay Hazare Trophy

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi breaks AB de Villiers record : वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीचेही मैदान गाजवले. महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या म्हणजेच रांची येथे खेळताना १४ वर्षीय वैभवने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. बिहारच्या उप कर्णधाराने सलामीला येताना महरौरसह पहिल्या विकेटसाठी १४.३ षटकांत १५८ धावा जोडल्या आणि त्यात वैभवच्याच शतकी धावा होत्या. वैभवने ३६ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे भारतीयाने झळकावलेले दुसरे वेगवान शतक ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com