Vijay Hazare Trophy: वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ! Ishan Kishan चे ३३ चेंडूंत शतक, तोही रेकॉर्ड साकिबूल गानीने मोडला...

Ishan Kishan 33 ball century Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीचा हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अवघ्या काही तासांत लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम तब्बल दोनदा मोडला गेला आणि वैभव सूर्यवंशीचा विक्रम झटक्यात उद्ध्वस्थ झाला.
Vaibhav Suryavanshi’s Record Broken Twice in a Day as Sakibul Gani Tops List

Vaibhav Suryavanshi’s Record Broken Twice in a Day as Sakibul Gani Tops List

esakal

Updated on

Sakibul Gani Fastest List A century by Indian cricketer: वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi ) ने बिहारकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध ३६ चेंडूंत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण, त्याचा हा विक्रम क्षणात उद्ध्वस्थ झाला... इशान किशनने ( ISHAN KISHAN ) आणि साकिबूल गानी ( SAKIBUL GANI) यांनी ३६ पेक्षा कमी चेंडूंत शतक पूर्ण करून वैभवला मागे सोडले. इशान किशन झारखंड संघाचे नेतृत्व करतोय आणि त्याने कर्नाटकाच्या गोलंदाजांना चोप दिला. साकिबूल हा बिहारचा कर्णधार आहे आणि त्याच्या शतकाने संघाला ६ बाद ५७४ धावांपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com