Vaishnavi Sharma maiden five-wicket haul against Zimbabwe Women
esakal
India Women vs Zimbabwe Women 3rd ODI Marathi Cricket News : भारतीय महिला संघाने तिसऱ्या व शेवटच्या वन डे सामन्यात झिम्बाब्वेवर सहज विजय मिळवला आणि मालिका ३-० अशी खिशात घातली. या सामन्यात फिरकीपटू वैष्णवी शर्मा ( Vaishnavi Sharma ) पुन्हा एकदा कमाल करून दाखवली. मागील सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या वैष्णवीने वन डे क्रिकेटमधील डावातील पाच विकेट्सचा पल्ला आज गाठला. तिने ३९ धावा देताना पाच विकेट्स घेतल्या आणि भारताच्या विजयाचा पाया भक्कम केला. त्यानंतर फलंदाजांनी सोपस्कार पूर्ण केले.