

DPL Fixing Controversy
esakal
Delhi Premier League fixing controversy: नुकताच दिल्ली प्रीमियर लीगचा हंगाम पार पडला. मात्र, या स्पर्धेनंतर फिक्सिंगच्या आरोपामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सेंट्रल दिल्ली किंग्सकडून खेळणाऱ्या वंश बेदीने एका क्रिकेटपटूने फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती अँटी करप्शन विंगला दिली आहे.
वंश बेदीकडे उत्तर प्रदेशातील एका क्रिकेटपटूने संपर्क साधला होता. हा खेळाडू त्यावेळी उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या टी-२० लीगमध्येही खेळत होता. वंशने या प्रकरणाची माहिती लगेच अँटी करप्शन विंगला दिली.