Team IndiaSakal
Cricket
IND vs ENG: टी२० मालिकेतील कामगिरीचं मिळालं बक्षीस! बुमराहच्या माघारीनंतर 'या' खेळाडूला मिळाली टीम इंडियात संधी
Varun Chakaravarthy added to India ODI Squad: भारत विरुद्ध इंग्लंड संघात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेच्या दोन दिवस आधीच भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी होत असलेली भारताची ही अखेरची वनडे मालिका आहे. अशातच भारतीय संघात शेवटच्या क्षणी मोठा बदल करण्यात आलेला आहे.
या मालिकेसाठी आधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली होती, पण तो पहिले दोन सामने खेळणार नसल्याचे यापूर्वीच निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने सांगितले होते.

