VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Varun Chakravarthy Ruled Out of Afghanistan T20 Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२०नंतर वरुण चक्रवर्तीच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे MRI तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित सामने खेळणार नसून आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
VARUN CHAKRAVARTHY

VARUN CHAKRAVARTHY

esakal

Updated on

VARUN CHAKRAVARTHY: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एमआरआय तपासणीत त्याच्या स्नायूंमध्ये ताण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वरुणच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com