

Impact Player Medal Winner in IND vs NED
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने पहिल्या फेरीच्या अखेरच्या सामन्यात बुधवारी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सला १७ धावांनी पराभूत केले. हा भारताचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला.
या विजयानंतर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पद्धतीनुसार भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये (India Dressing Room) 'इम्पॅक्ट प्लेअर'चे मेडल (Impact Player Medal) देण्यात आले. हे मेडल सामन्यात प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूला देण्यात येते. या मेडल देण्याच्या सोहळ्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.