IND vs SA, T20 WC: अभिषेक शर्मा OUT, संजू सॅमसनला एक संधी? भारत Super 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध Playing XI मध्ये बदल करणार

India likely playing XI vs South Africa Super 8: वर्ल्ड कपच्या सुपर ८ फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून, या महत्त्वाच्या लढतीपूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म सातत्यपूर्ण नसल्याने त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे.
India likely playing XI vs South Africa Super 8

India likely playing XI vs South Africa Super 8

esakal

Updated on

IND vs SA Super 8 team news and updates: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली असली तरी ज्या अभिषेक शर्माकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. अभिषेक तीन सामन्यांत खाते न उघडताच मैदानाबाहेर गेला, तर एका सामन्यात दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन ( Sanju Samson ) याला संधी मिळाली, परंतु तो ८ चेंडूंत २१ धावा करून माघारी परतला. पण, आता सुपर ८ ची फेरी सुरू होतेय आणि भारताला या समस्येवर तोडगा शोधणे गरजेचे आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com