

Vidarbha Cricket Team
Sakal
Vidarbha Win Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचे विजेतेपद विदर्भ क्रिकेट संघाने जिंकले आहे. गेल्यावर्षी त्यांचे विजेतेपद थोडक्यात हुकल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यावर्षी मात्र त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
विदर्भाने रविवारी (१८ जानेवारी) बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सौराष्ट्राला ३८ धावांनी पराभूत केले आणि पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीवर (VHT 2025-26) नाव कोरले. त्यामुळे विदर्भ (Vidarbha Cricket Team) विजय हजारे ट्रॉफीचे नवे विजेते ठरले आहेत.