

Harsh Dubey Takes 6 Wickets
Sakal
Harsh Dubey 6 Wickets for Vidarbha vs Uttar Pradesh: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील सातव्या फेरीत विदर्भासमोर उत्तर प्रदेशचे आव्हान आहे. या सामन्याला गुरुवारपासून (२९ जानेवारी) नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्याचल दिवशी विदर्भाने उत्तरप्रदेशवर वर्चस्व ठेवले असून याचे श्रेय २३ वर्षीय अष्टपैलू हर्ष दुबेला (Harsh Dubey) जाते.
हर्ष गेल्या काही महिन्यांपासून ज्याप्रकारे खेळत आहे, ते पाहाता तो विदर्भासाठी (Vidarbha) प्रमुख खेळाडू ठरत आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्धही दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले.