ट्वेंटी-२० वर्ल्डकप २०२४ फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अविश्वसनीय झेल टिपून भारताचा विजय निश्चित केला.
त्या झेलनंतर बाऊंड्री लाईन मागे सरकवली गेल्याचा वाद निर्माण झाला.
अंबाती रायुडूने मान्य केले की ब्रॉडकास्टर्सनी खुर्ची व स्क्रीन बसवण्यासाठी सीमारेषा मागे ढकलली होती.
Ambati Rayudu’s Shocking Claim on Suryakumar Yadav Catch : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेला अविश्वसनीय झेल, क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला गेला. त्या झेलने भारताचे २००७ नंतरही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्नपूर्ण केले. पण, त्या कॅचवरून बराच वाद रंगला होता... बाऊंड्री लाईन मागे सरकवली गेल्याचा आरोप झाला आणि त्यावरून बराच वादही रंगला. आता भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने या वादाला दुजोरा दिला आहे. त्याने सीमारेषा मागे केल्याचे मान्य केले आणि आता त्यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.