
यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण असे असताना गेल्या अनेक महिन्यांपासून तो त्याच्या कामगिरीने सातत्याने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. त्यामुळे आता गौतम गंभीर प्रशिक्षक असलेल्या भारताच्या संघात तो पुनरागमन करणार का, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सध्या इशान किशन इंग्लंडमधील मैदानं गाजवताना दिसतोय.
एकिकडे भारताचा कसोटी संघ इंग्लंडविरुद्ध मालिके खेळत असतानाच इशान किशन काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीने लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे एकाच सामन्यात त्याने वेगवेगळ्या भूमिका निभावताना दिसला आहे.