
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी (९ मार्च) खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. विजेतेपदासाठी हा सामना खेळला जात असल्याने दोन्ही संघात चुरस दिसत आहे. दरम्यान, सुरुवातीलाच नाट्यमय घडामोडी घडल्याचे या सामन्यात दिसले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी सलामीला फलंदाजीला उतरत डावाची सुरुवात केली.