
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (९ मार्च) दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर ही स्पर्धाही संपेल. ही वनडे प्रकारातील स्पर्धा आहे. यानंतर आता वनडेतील मोठी स्पर्धा थेट दोन वर्षांनी होणार आहे.
२०२७ साली वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी अजून २ वर्षे असल्याने काही मोठे निर्णय यादरम्यान झालेले दिसू शकतात. नुकतेच स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या चाहत्यांच्या मनामध्येही पाल चुकचुकली आहे. कारण भारतीय संघातही तीन असे खेळाडू आहे, ते निवृत्तीचा विचार करू शकतात. तसेच न्यूझीलंड संघालाही असा एखाद्या मोठा धक्का बसू शकतो. या अंतिम सामन्यानंतर कोणते चार खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात, हे जाणून घेऊ.