Australia vs India 3rd Test
Australia vs India 3rd TestSakal

IND vs AUS, 3rd Test: भारताने सलग तिसऱ्यांदा जिंकला टॉस! द गॅबा कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये दोन मोठे बदल

Australia vs India The Gabba Test Playing XI: ब्रिस्बेनमध्ये होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे.
Published on

Australia vs India 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून (१४ डिसेंबर) सुरू झाला आहे. ब्रिस्बेनमधील प्रसिद्ध द गॅबा या स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने या मालिकेत सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे. पण पहिल्या दोन सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. पण तिसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Australia vs India 3rd Test
IND vs AUS : सीधी बात, नो बकवास! Rohit Sharma 'ढोल्या', तो पाच दिवस क्रिकेट खेळूच शकत नाही; कर्णधारावर कोणी केलीय टीका?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com