Rishabh Pant trolls Ravindra Jadeja during India T20 World Cup anniversary
लंडनमध्ये दाखल झालेल्या भारताच्या कसोटी संघाने रविवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ विजयाच्या वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मागच्या वर्षी २९ जूनला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता. २००७ नंतर प्रथमच टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि १३ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. फायनल सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजयाची नोंद केली होती. या विजयाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्ताने भारताच्या कसोटी संघाने हॉटेलमध्ये केक कापून सेलिब्रेशन केलं.