
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत होता. त्याच्यावर यामुळे टीकाही होत होती.
परंतु, अखेर रविवारी कटकमधील बाराबाती स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे सामन्यात त्याला सूर सापडला. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने वादळी खेळ केला. त्याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.