
Sri Lanka vs Australia: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गॉल येथे सुरू आहे. या मालिकेत पॅट कमिन्सच्या अनुपस्थितित स्टीव्ह स्मिथ कर्णधारपद सांभाळत आहे. स्मिथने नेतृत्वाची धूरा सांभाळताना फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही मोलाची कामगिरी बजावली आहे.
त्याने दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तसेच क्षेत्ररक्षणातही त्याने रिकी पाँटिंगचा एक मोठा विक्रम मोडला आहे. त्याने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (८ फेब्रुवारी) एक लक्षवेधी झेल घेतला.