
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यात पाकिस्तान संघाला शनिवारी वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ४३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी वनडे मालिका ३-० अशा फरकाने गमावली.
वनडे मालिकेपूर्वी पाकिस्तानने टी२० मलिकेतही ४-१ असा पराभव स्वीकारला होता. माऊंट मौनगानुई येथे झालेल्या तिसऱ्या वनडेनंतर एक वादग्रस्त घटना घडली, ज्यावर नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाकडून तक्रारही करण्यात आली आहे.