Shubman Gill hands over the Test series trophy to Narayan Jagadeesan after India’s win against West Indies.
esakal
Shubman Gill’s Gesture Wins Hearts: भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी मालिका जिंकली. इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर गिलच्या ( Captain Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया घरच्या मैदानावर पहिलीच कसोटी मालिका खेळली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका २-० अशी जिंकली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC Point Table) या विजयामुळे भारताच्या विजयाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. या विजयानंतर कर्णधार शुभमन गिलने परंपरा कायम राखली आणि विजयाची ट्रॉफी नव्या खेळाडूच्या हाती सोपवली.