Prithvi Shaw reacts angrily to Musheer Khan’s sledge
esakal
What happened between Prithvi Shaw and Musheer Khan? पृथ्वी शॉने पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान गाजवताना मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात धुमाकूळ घातला. पण, फक्त फलंदाजीने नव्हे, तर राड्यानेही तो चर्चेत आला. रणजी करंडक स्पर्धेच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा तीन दिवसीय सराव सामना कालपासून सुरू झाला. महाराष्ट्राने पहिल्या दिवसात ४५० धावांचा टप्पा ओलांडला. पृथ्वी शॉ व अर्शिन कुलकर्णी यांच्या शतकांनी दिवस गाजला. पण, पृथ्वी व मुंबईचा फिरकीपटू मुशीर खान यांच्यातल्या वादाने सामन्याला गालबोट लागले.