इंडियन प्रीमिअर लीगची 'कॉपी' करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पाकिस्तान सुपर लीग ( PSL) सुरू केली. पण, या लीगकडे पाठ फिरवून स्टार खेळाडू आयपीएलला प्राधान्य देताना दिसले. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात PSL साठी करारबद्ध असलेल्या कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी PCB ला ठेंगा दाखवला. यंदा PSL आणि IPL च्या तारखा क्लॅश होत आहेत आणि त्यामुळे आमचीच लीग कशी चांगली आहे, हे दाखवण्याचा पाकिस्तानी खेळाडू आतापासूनच केवीलवाणा प्रयत्न करू लागले आहेत.