Virat Kohli 77 runs against Gujarat Vijay Hazare Trophy
esakal
Vijay Hazare Trophy live Virat Kohli batting performance: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यांत विराट कोहलीने ( Virat Kohli ) शतक झळकावेल असे वाटत होते. मुंबईकडून खेळणारा रोहित शर्मा गोल्डन डकवर माघारी परतला असताना विराटने दमदार खेळ केला. गुजरातविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि दुसऱ्याच षटकात त्यांना धक्का बसला. सलामीवीर प्रियांश आर्या १ धावेवर बाद झाल्यानंतर विराटने फटकेबाजी केली आणि डाव सावरला. तो आजही शतक झळकावेल असे वाटत असताना त्याला माघारी परतावे लागले.