Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा दोन सामन्यांसाठी संघात, वाचा कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार; विराट कोहलीचेही टीममध्ये नाव

Rohit Sharma Vijay Hazare Trophy Mumbai team: भारतीय क्रिकेटचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली विजय हजारे करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत. दीर्घ काळानंतर हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Virat Kohli - Rohit Sharma | ICC ODI Rankings

Virat Kohli - Rohit Sharma | ICC ODI Rankings

Sakal

Updated on

Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025 Delhi squad : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) व विराट कोहली यांची विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी अनुक्रमे मुंबई व दिल्ली संघाच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झाली. भारताच्या वन डे संघातील स्थान टिकवून ठेवायचे असल्यास देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळावी लागेल, असे BCCI ने स्पष्ट केले होते. सलामीवीर यशस्वी जैस्वालने अद्याप तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिसपासून पूर्णपणे बरा झालेलो नाही आणि स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी उपलब्ध राहणार नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com