INDU19 vs SL U19 : द्रविडच्या लेकाला संघाबाहेर करण्याची चूक; टीम इंडिया हरली, श्रीलंकेचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय

Rahul Dravid son left out of India U19 squad: भारताच्या १९ वर्षांखालील संघाला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या युवा वनडेत शेवटच्या चेंडूवर एक विकेटने हृदयद्रावक पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
Sri Lanka U19 beat India U19 on final ball

Sri Lanka U19 beat India U19 on final ball

esakal

Updated on: 

India U19 vs Sri Lanka U19 3rd Youth ODI highlights: मागील सामन्यात ८७ धावांची खेळी करणाऱ्या अन्वय द्रविडला भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या व निर्णायक सामन्यात बाहेर बसवले. श्रीलंका १९ वर्षांखालील संघाने थरारक सामन्यात भारतावर १ विकेट राखून विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. विनीथ व्ही केच्या १३१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद २९० धावा केल्या आणि त्याला शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत श्रीलंकेने बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com