
Vinod Kambli happy birthday : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. १८ जानेवारी हा विनोदचा वाढदिवस असतो आणि १९७२ मध्ये याच तारखेला त्याचा मुंबईत जन्म झाला. कांबळी आता ५३ वर्षांचा झाला आहे. मात्र, ही तारीख त्याच्यासाठी आणखी एका कारणासाठी खास आहे. १८ जानेवारीलाच त्याने असा चमत्कार घडवून आणला होता, जो तो कधीच विसरू शकणार नाही. विनोद कांबळीने १८ जानेवारीलाच आपल्या वन डे कारकीर्दितील पहिले शतक झळकावले होते. तेव्हा कांबळीचा २१ वा वाढदिवस होता आणि त्याने जयपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.