
Vinod Kambli Emotional Video will make you cry: वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA) विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबई क्रिकेटचा इतिहास पुन्हा लोकांसमोर मांडला जात असताना आजी माजी खेळाडूंचा सत्कारही केला जातोय. आज MCA कडून मुंबईतील ग्राऊंड्समन्सचा गौरव केला जाणार आहे आणि यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून अजिंक्य रहाणेची उपस्थित असणार आहे.