
Vinod kambli Financial Help: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्यामुळे त्याला भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला होता. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विनोद कांबळी यांची विचारपूस केली तसेच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी वानरसेना या संस्थेमार्फत कांबळीला आर्थिक मदत केली आहे.