

Michael Vaughan reacts to viral bowler with action inspired by Murali, Warne, Bhajji & Kumble.
MURALI + HARBHAJAN + WARNE + KUMBLE In One Action : मुथय्या मुरलीधरन, हरभजन सिंग, शेन वॉर्न अन् अनिल कुंबळे हे त्यांच्या काळातील महान फिरकीपटू होते आणि त्यांनी राष्ट्रीय संघासाठी अनेक सामने गाजवले. या फिरकीपटूंचा एक वेगळा चाहतावर्ग आहे आणि यांना पाहून अनेक युवकांनी फिरकीपटू होण्याचं स्वप्नही पाहिलं. या सर्व महान फिरकीपटूंची गोलंदाजी करण्याची आपापली शैली होती, परंतु या चारही गोलंदांजी शैली एकाच खेळाडूमध्ये पाहायला मिळाल्यास? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात गोलंदाजाची शैली पाहून मैदानावरील अम्पायर, फलंदाजासह क्रिकेटविश्व स्तब्ध झालं आहे.