ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताने ६ धावांनी थरारक विजय मिळवत मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा शेवटचा डाव कोसळला आणि भारताचा विजय निश्चित झाला.
सिराजने निर्णायक विकेट घेत गस एटकिन्सनला त्रिफळाचित केलं, हा भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी फरकाने मिळालेला विजय ठरला.
Gautam Gambhir got visibly emotional and teary-eyed : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा पाचवा दिवस हा अविश्वसनीय रोमांच घेऊन आला होता. भारताला या कसोटीत विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवायची होती, तर इंग्लंडला ३-१ अशी मालिका आपल्या नावावर करायची होती. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती आणि त्यांच्या ४ विकेट शिल्लक होत्या. मात्र, मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीने सामन्याचे चित्रच पालटले आणि त्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील आनंद पाहण्यासारखा होता. एरवी गंभीर दिसणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या डोळ्यात पाणी तरळले...