Hardik Pandya and Gautam Gambhir during a tense moment
esakal
Hardik Pandya Gautam Gambhir dressing room argument video: भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांना सपशेल अपयश आलेले दिसले आणि या सामन्यानंतर हार्दिक पांड्या व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हार्दिक व गौतम ड्रेसिंग रूममध्ये जात असतानाचा एक Video Viral झाला आहे आणि त्यात दोघांमध्ये काहीतरी गंभीर संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे.