Pakistani fan’s emotional rant praising India goes viral after Asia Cup defeat
esakal
IND vs PAK Pakistani reaction to India’s Asia Cup 2025 win : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये बराच ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय संघाच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पळ काढावा लागला. भारताने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊन त्यांची जगासमोर नाचक्की केली, त्यामुळे त्यांना मैदान सोडून जावे लागले. भारताने या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला तिन्ही सामन्यांत पराभवाची धुळ चाखवली. आता पाकिस्तानी चाहतेही सततच्या पराभवामुळे संतापले आहेत आणि अशीच एक व्यथा मांडणारा Video Viral झाला आहे.