A young fan runs with joy after receiving Virat Kohli’s autograph
esakal
Child dancing after getting Virat Kohli’s autograph : गेली १०-१५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीचा जगभरात चाहता वर्ग आहे. विराटने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि आताची युवा पिढी त्याला आदर्श मानतेय. विराटचा चाहता वर्ग हा एका विशिष्ठ वयोगटापुरता मर्यादित नाही, त्यात वयोवृद्ध ते लहान मुलं-मुली असे सर्व येतात. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या विराटला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. त्याच्या ऑटोग्राफसाठी धडपड करताना दिसत आहे. अशात विराटचा ऑटोग्राफ मिळवल्यानंतर चिमुरड्याचा डान्स व्हायरल झाला आहे.