Viral Video : सुरूवात त्याने केलीय, शेवट मी करणार... न्यूझीलंडच्या गोलंदाजाची आकाश दीपला सरळसरळ धमकी, IND vs NZ 2nd Test मध्ये खळबळ उडवणारा प्रसंग

Kyle Jamieson warning to Akash Deep viral video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप फलंदाजीसाठी मैदानात आला असताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने त्याच्या हेल्मेटवर चेंडू मारला.
Kyle Jamieson warning to Akash Deep viral video

Kyle Jamieson warning to Akash Deep viral video

esakal

Updated on: 

Kyle Jamieson's Explosive Remark to Akash Deep: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस नाट्यमय वळणांचा राहिला... दुसऱ्या षटकात विकेट गेल्यानंतर भारताची अवस्था ७ बाद ११७ अशी दयनीय झाली, त्यानंतर ध्रुव जुरेलने संयमी व दमदार खेळ करून संघाला २४६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याच्यासोबतीला आकाश दीप व गुरनूर ब्रार हे गोलंदाज उभे राहिले होते. हेच पाहून न्यूझीलंडचे गोलंदाज चिडले आणि त्यांच्याकडून बाऊन्सरचा मारा सुरू झाला. कायले जेमिन्सनने टाकलेले दोन बाऊन्सर आकाशच्या हेल्मेटवर आदळले, तर मॅट हेन्रीचा वेगवान चेंडू ब्रारच्या मानेवर आदळला. प्राथमिक उपचार घेऊन दोन्ही खेळाडू तरीही मैदानावर उभे राहिले. दरम्यान, जेमिन्सनने Live मॅचमध्ये सरळसरळ आकाशला धमकी दिल्याचा Video Viral झाला आहे.

Loading content, please wait...