
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच अचानक कसोटी कर्णधारपद सोडल्याने चर्चेत आला होता. आता एका वेगळ्यात कारणासाठी तो चर्चेचा विषय ठरला आहे. एका फँटसी क्रिकेट कॉन्टेस्ट विजेत्याला त्याने त्याची लँबोर्गिनी उरुस ही आलिशान कार भेट दिली आहे.
खरंतर तो त्याच्या निळ्या लँबोर्गिनीतून मुंबईत फिरताना अनेकदा दिसला आहे. त्याची ही कार २६४ या क्रमांकाने नोंदणी केलेली आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च २६४ धावांची खेळी केलेली आहे. त्या खेळीच्या स्मरणार्थ त्याने या कारच्या क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.
या कारची भारतीय बाजारात साधरण ४ कोटी रुपये किंमत आहे. पण आता ती त्याने फँटसी क्रिकेट कॉन्टेस्ट विजेत्याला भेट दिली आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.