Rohit Sharma visits Mumbai Police Cha Raja Ganpati in Worli
esakal
भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईत "मुंबई पोलीसचा राजा" गणपतीच्या दर्शनाला पोहोचला.
रोहितने स्वतः आरती करून, लोटांगण घालून बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
त्याच्या फिटनेस व वजन कमी झाल्याने तो २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचे दिसले.
Rohit Sharma visits Mumbai Police cha Raja Ganpati in Worli : भारताच्या वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत पोहोचला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरळी येथील प्रसिद्ध "मुंबई पोलिसांचा राजा" मंडपात रोहितने बाप्पाचे दर्शन घेतले. त्याने स्वतः आरती केली, लोटांगण घालून आशीर्वाद घेतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज होणाऱ्या रोहितच्या फिटनेसमध्ये कमालीचा बदल जाणवला आणि तो २०२७च्या वर्ल्ड कपसाठी मेहनत घेतोय, हे यातून दिसले.