Virat Kohli’s adorable moment with Shubman Gill and Shreyas Iyer goes viral
Virat Kohli’s viral video with Shubman Gill and Shreyas Iyer: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पहिल्याच वन डे सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. विराट कोहलीनंतर तिन्ही स्वरूपात संघाचे नेतृत्व करताना पहिला सामना गमावणारा गिल हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. रोहित शर्मा व विराट कोहली सारखे दिग्गज संघात असताना नेतृत्व करण्याचं दडपण शुभमनवर होतं, परंतु त्याने त्याचे कौशल्य यापूर्वी सिद्ध करून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत भारताच्या डावात पावसाने खोडा घातला आणि २६ षटकांचा हा सामना यजमानांनी ७ विकेट्स राखून जिंकला. पण, या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.