Vaibhav Sooryavanshi reacts to fans screaming his name
esakal
Vaibhav Sooryavanshi reacts to fans screaming his name: भारताचा संघ परदेश दौऱ्यावर गेला की तिथे विराट कोहली, रोहित शर्मा या दिग्गजांच्याच नावाची अधिक चर्चा केली जायची.. पण, सध्या सर्वांच्या मुखावर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे नाव आहे... एरवी भारत-आयर्लंड मालिका ढुंकूनही न पाहणारे केवळ अन् केवळ वैभवच्या पदार्पणाच्या आशेने या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहताना दिसले. पण, त्यांच्या पदरी निराशा पडली.. मात्र, आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची उत्सुकता वाढली आहे.. वैभवच्या नावाची जेवढी मार्केटींग करता येईल, तेवढी केली जात आहे. भारताच्या संघात अनेक स्टार खेळाडू आहेत, परंतु हवा फक्त वैभवचीच आहे आणि त्यामुळेच या बॉस बेबीला पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहेत. पण, ही गर्दी वैभवला अडचणीत आणणारी ठरतेय...