Virat Kohli applauds the Gujarat spinner after being clean bowled in a Vijay Hazare Trophy match
esakal
Virat Kohli ball of the century Vijay Hazare Trophy : विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षानंतर मैदानावर उतरला आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवली. BCCI च्या सल्ल्यानुसार विराटने दोन सामने खेळले, परंतु तो आणखी एक सामना खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विराटने विजय हजारे ट्रॉफीतील पुनरागमनाच्या सामन्यात १३१ धावांची खेळी केली, त्यानंतर काल झालेल्या दुसऱ्या लढतीत त्याने ७७ धावा केल्या. त्याचे सलग दुसरे शतक २३ धावांनी हुकले आणि गुजरातचा फिरकीपटू विशाल जयस्वालच्या अप्रतिम चेंडूवर तो यष्टिचीत झाला. सोशल मीडियावर या विकेट्सची व जयस्वालने टाकलेल्या चेंडूची चर्चा रंगली आहे.