

Virat Kohli Viral Video | RCB vs GT | IPL 2026
Sakal
IPL 2026, RCB vs GT, Virat Kohli Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मंगळवारी (२६ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या क्वालिफायर १ (Qualifier 1) सामन्यात बंगळुरूने ९२ धावांनी मोठा विजय मिळवला. हा विजय त्यांना सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात घेऊन गेला आहे.
या सामन्यादरम्यान बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) एका वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातही त्याने गुजरातची उडवलेली खिल्ली आणि मग सामन्यानंतर अनुष्का शर्माला (Anushka Sharma) मारलेली मिठी या घटनेची बरीच चर्चा झाली.