

Virat Kohli funny moment at Lord's
Sakal
Virat Kohli latest viral video: भारताचा इंग्लंड दौरा रविवारी (१९ जुलै) संपला. लॉर्ड्सवर अखेरचा आणि निर्णयाक वनडे सामना रविवारी झाला, ज्यात इंग्लंडने भारताला २७ धावांनी पराभूत केलं. त्यामुळे इंग्लंडने ३ सामन्यांची वनडे मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात काही नाट्यमय घटनाही घडल्या.
भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल यांनी विजयासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न कमी पडले. दरम्यान, विराट (Virat Kohli) हा त्याच्या खेळासाठी आक्रमक आणि जिद्दी असल्याचे दिसून येतो, पण लॉर्ड्स वनडेत फलंदाजीला जाण्यापूर्वी त्याचे विनोदी रुप पाहायला मिळाले आहे.