
India vs Pakistan, Champions Trophy 2025: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा रविवारी पाकिस्तानविरुद्ध तळपली आहे. दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत झालेल्या सामन्यात विराटने शतक करत भारताला पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगादन दिले.
विराटने या सामन्यात १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. या शतकी खेळीसह विराटने अनेक विक्रम केले आहेत.
विराटचे वनडेमधील हे ५१ वे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ८२ वे शतक आहे. तो वनडेतील सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे, ज्याची १०० शतके आहेत.