
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात चॅम्पियन्स ट्ऱॉफी २०२५ स्पर्धेत दुबईमध्ये सामना होत आहे. जेव्हाही या दोन संघात सामना होतो, तेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. तसेच या सामन्यात काट्याची टक्करही पाहायला मिळते, अनेकदा दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाचीही होती.
अशीच घटना रविवारीही घडली. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्यात काही क्षण तणावाचे वातावरण झाल्याचे दिसले होते.