Washington Sundar ruled out of IND vs NZ T20 series
esakal
Team India injury concerns before T20 World Cup: भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी डोकेदुखी वाढतानाच दिसत आहे.. तिलक वर्मा, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी दुखापत झाली. वॉशिंग्टन ( Washington Sundar ) पहिल्या वन डे सामन्यात दुखापतग्रस्त झाला आणि त्याला उर्वरित दोन्ही सामन्यांतून माघार घ्यावी लागली. त्याच्याजागी आयुष बडोनी याला संघात स्थान मिळाले. पण, आता सुंदरची दुखापत आणखी गंभीर असल्याचे वृत्त समोर आलेले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार घेतली आहे. या वृत्तामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तिलक वर्माही ( Tilak Varma) याच नौकेवर स्वार आहे आणि ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे.