ENG vs IND, 3rd ODI: कोहलीच तिसऱ्या क्रमांकाचा 'किंग' ! शतक हुकलं, पण विश्वविक्रम रचला; विलियम्सन-पाँटिंगला टाकलं मागे

Virat Kohli's World Record: भारताला लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्ध वनडेत पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात विराट कोहलीने वैयक्तिकरित्या मोठा विक्रम केला आहे. त्याने विलियम्सन आणि पाँटिंग यांना मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.
Virat Kohli | India vs England Lord's ODI

Virat Kohli | India vs England Lord's ODI

Sakal

Updated on

England vs India 3rd ODI: भारतीय संघाला लॉर्ड्समध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मोठे प्रयत्न केले, पण अखेर त्यांचे प्रयत्न कमी पडले. पण असं असलं तरी या सामन्यात विराट कोहलीने एका मोठ्या विश्वविक्रमाला (Virat Kohli World Record) गवसणी घातली आहे.

Virat Kohli | India vs England Lord's ODI
IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com