

Virat Kohli - Gautam Gambhir controversy
Sakal
IND vs ENG ODI marathi news: भारतीय वनडे संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून आजपासून (मंगळवार, १४ जुलै) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतून विराट कोहली (Virat Kohli) देखील पुनरागमन करत आहे, तसेच रोहित शर्माही या मालिकेचा भाग असल्याने ते आकर्षणाचे केंद्रबिंदु आहेत.
भारतीय संघ (Team India) या मालिकेसाठी गेल्या काही दिवसांपासून सराव करत आहे. मात्र यादरम्यानच अशीही माहिती मिळत आहे की विराट आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात काहीतरी मतभेद असल्याची शक्यता आहे. त्यांनी एकमेकांसोबत संवाद टाळला आहे.